…. त्यावेळीच महाराष्ट्राचा खरा अपमान झाला !
…. त्यावेळीच महाराष्ट्राचा खरा अपमान झाला !
काँग्रेसने कोरोना प्रकरणी मोदींना नाही मुख्यमंत्र्यांना जाब विचारावा.
मुंबई, दि. 10 फेब्रुवारी:
महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आणि सर्वाधिक कोरोना मृत्यू झाले त्यावेळीच महाराष्ट्राचा खरा अपमान झाला. कोरोना रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत, एका चितेवर २४ मृतदेहांचे दहन केले, एका रुग्णवाहिकेतून २० मृतदेह नेले त्यावेळी महाराष्ट्राचा खरा अपमान झाला, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्र काँग्रेस व उत्तर भारतीय मजुरांना कोरोना स्प्रेडर म्हणून अपमान केला त्याबद्दल मोदी व भाजपाने माफी मागावी अशी मागणी केली आहे.त्यावर चंद्रकांत पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कोरोनाच्या लाटेत परप्रांतीय मजुरांना भरवसा देण्यात राज्याचे सरकार कमी पडले व त्यामुळे त्यांनी पलायन केले, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले. या सर्वांचा जाब खरे तर काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना विचारायला हवा होता व त्यांच्याकडे माफीची मागणी करायला हवी होती.
किराणा दुकानांमध्ये वाईनच्या विक्रीला परवानगी, परमविरसिंग यांनी सचिन वाझेबाबत आरोप केल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी राजीनामा देण्याचे टाळणे, पोलिसांच्या बदल्यांबाबत अनिल देशमुख यांनी अनिल परब यांच्यावर आरोप केल्यानंतरही परब मंत्रिपदावर चिटकून राहणे यांच्या विरोधात भाजपा लवकरच राज्यव्यापी आंदोलन छेडेल असेही पाटील म्हणाले.
