काय खायचं ? कसे कपडे वापरायचे हे भाजप व संघ परिवार ठरवणार का?
काय खायचं ? कसे कपडे वापरायचे हे भाजप व संघ परिवार ठरवणार का?
मुंबई दि. ९ फेब्रुवारी :
देशामध्ये कुणी काय खायचं… कुणी कसे कपडे वापरायचे हे भाजप आणि संघपरिवार ठरवणार का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधानांना ट्वीट करुन केला आहे.
मुस्लिम मुली हायस्कूल आणि महाविद्यालयात जाऊन शिकत आहेत ही समस्या आहे का? मुली शिकवा या घोषणेचं काय झालं? भाजप आणि संघपरिवाराकडून नागरिकांच्या मुलभूत अधिकारांची ही सरळसरळ पायमल्ली आहे , असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
