मोदींच्या ६० मिनिटांच्या भाषणात ५० वेळा काँग्रेसचा गजर !

0
20220209_000308

मोदींच्या ६० मिनिटांच्या भाषणात ५० वेळा काँग्रेसचा गजर !

लतादीदींच्या निधनानंतर पंतप्रधानांकडून मंगेशकर कुटुंबाच राजकारणासाठी वापर .

मुंबई, दि. 8 फेब्रुवारी:
संसद हे कायदेमंडळ आहे राजकीय सभेचा आखाडा नाही हे बहुदा पंतप्रधान नरेंद्र मोदी विसरले असावेत. पाच राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पंतप्रधानांनी मतांची गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न केला. आपल्या ६० मिनिटांच्या भाषणात मोदींनी किमान ५० वेळा काँग्रेसचा गजर करून एका अर्थाने काँग्रेसचा प्रचारच केला. खोटा इतिहास सांगून मते मिळविण्याचा पंतप्रधानांचा हा केविलवाणा प्रयत्न होता, अशी टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात केली.

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, खरे तर काँग्रेस निरपेक्ष भावनेने काम करते. देशाच्या उभारणीत काँग्रेसचे योगदान वादातीत आहे. काँग्रेसने अशा गोष्टींचा वापर राजकारणासाठी कधीच केला नाही. गेली पन्नास वर्ष मी देशाचे राजकारण जवळून बघतो आहे, त्यात प्रत्यक्ष सहभागी आहे. पंतप्रधान पदावर विराजमान असलेल्या व्यक्तिमत्त्वाने नेहमी संसद भवन आणि लाल किल्ल्यावरून राजकीय सभेतील भाषण करू नये अशी अपेक्षा आहे, हे देशाच्या एकतेसाठी आणि अखंडतेसाठी आवश्यक आहे, असे माझे स्पष्ट मत आहे.

लतादीदी यांनी आपल्या दैवी सुरांनी अखिल मानवजातीला आनंद दिला. लतादीदींच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबियांच्या नावाचा वापर पंतप्रधानांनी राजकारणासाठी सुरू केला हे वेदनादायक आहे. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समोर लतादीदींनी गायलेले ए मेरे वतन के लोगो हे गीत अजरामर झाले. पद्मभूषण, उत्कृष्ट पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार, राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, राष्ट्रीय स्तरावर चा जीवन गौरव पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार असे अनेक सन्मान देऊन जेव्हा देशाने लतादीदींचा गौरव केला तेव्हा देशात आणि राज्यात काँग्रेसची सरकारे होती. काँग्रेसने कधीच या पुरस्कारांचा राजकीय वापर केला नाही, कारण तो कलेचा सन्मान होता.

काँग्रेसने कायमच लता मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबियांचा सन्मान केला आहे. पंडितजी, इंदिराजी आणि अगदी सोनियाजी देखील लतादीदींच्या कलेच्या चाहत्या आहेत. मंगेशकर कुटुंबीयांनी केलेली कलेची उपासना वादातीत आहे. तुमच्या आमच्या राजकारणाच्या पलीकडची आहे, असेही थोरात म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *