मुंबईत घटस्फोट वाढण्याचे कारण ‘ट्रफिक’ ?
मुंबईत घटस्फोट वाढण्याचे कारण ‘ट्रफिक’ ?
मुंबई, दि. ४ फेब्रवारी :
मुंबईसारख्या शहरात घटस्फोट होण्याचे कारण ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. मुंबईत वाहतूक कोंडीमुळे जवळपास ३ टक्के जोडप्यांचा घटस्फोट झाला आहे. पती-पत्नी आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाहीत त्यामुळे घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे, असा दावा अमृता फडणवीस यांनी केला आहे.
अमृता फडणवीस म्हणाल्या की, ‘मी मुंबईतील समस्यांवरुन बोलते तेव्हा माझं मानसिक संतुलन गेलं आहे अशी टीका केली जाते. पण मी एक सामान्य स्त्री म्हणून बोलते. मी देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी आहे हे तुम्ही विसरुन जा. मी एक सामान्य बाई आहे. मीदेखील दररोज सामान्य स्त्रियांप्रमाणे घराबाहेर पडते. मलाही खड्डे आणि ट्रॅफिक जॅममुळे त्रास होतो. आता यावर बोलणार नाही तर काय करणार?
मुंबईत अनेक समस्या प्रलंबित आहेत. मेट्रोचे काम पुढे सरकलेले नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. पण महाविकासआघाडी सरकार यापैकी कशाकडेही लक्ष देत नाही. राज्य सरकार केवळ पक्षपातीपणे काम करत आहे. कारवाई करताना प्रत्येकाला वेगवेगळे निकष लावले जातात.
