IMG_20211223_112331

…. फिर भी सरकार झुकेगी नही !

मुंबई, दि. ३ फेब्रुवारी :
ईडी, सीबीआय, एनआयए या केंद्रीय एजन्सींचा दुरुपयोग करुन विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण भाजपवाल्यानो सत्तेचा दुरुपयोग करून केंद्रीय एजन्सींना पाठीशी लावण्याचा प्रयत्न केला तरीही सरकार झुकणार नाही, असा स्पष्ट इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.

नवाब मलिक म्हणाले की, महाराष्ट्रात आघाडी सरकार झुकत नाही लक्षात येताच अनिल देशमुख असतील किंवा आता संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई करुन अडचणीत आणण्यासाठी वेगवेगळे डाव भाजप खेळत आहे. निवडणुकीच्या आधी शरद पवार यांना ईडीने नोटीस बजावली. तामिळनाडूमध्ये डीएमकेच्या नेत्यांच्या घरी छापेमारी करण्यात आली आता उत्तरप्रदेशमध्ये ही हेच उद्योग सुरू आहेत.

देशात ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झालीय त्यावरुन पाच राज्यातील निवडणूकीतून हे सगळे समोर येणारच आणि या यंत्रणांचा वापर जास्त दिवस चालणार नाही अशी खात्रीही नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *