संजय राऊतांच्या निकटवर्तीयाला ईडीकडून अटक

0
SS

संजय राऊतांच्या निकटवर्तीयाला ईडीकडून अटक..

मुंबई, दि. २ फेब्रुवारी:

भाजपाला अंगावर घेणारे फायरब्रँड शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने जोरदार धक्का दिला आहे. दोनच दिवसापूर्वी संजय राऊत यांनी अमित शाह यांचा मुलगा काय केळी, ढोकळा विकतो काय? असा सवाल केला होता. त्यानंतर संजय राऊतांचे निकटवर्तीय आणि उद्योजक प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली आहे. हा योगायोग आहे का, असा सवालही आता विचारला जात आहे.

प्रवीण राऊत हे एचडीआयएलची उपकंपनी असलेल्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शनचे संचालक आहेत. डिसेंबर २०२० मध्ये पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात प्रवीण राऊत यांचे नाव समोर आले होते. प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी यांनी २०१० मध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ५५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिल्याचे उघड झाले होते.

एचडीआयएलमधील एक हजार ३४ कोटींचा घोटाळा समोर आल्यानंतर आता प्रविण राऊत यांना अटक करण्यात आली आहे. प्रविण राऊत यांच्या पत्नीच्या खात्यामधून संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात आले होते आणि याचे पुरावे ईडीला मिळाले होते.

प्रवीण राऊत यांचा पालघर जिल्ह्यातील सफाळे येथे रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. डीएचआयएल या कंपनीची उपकंपनी असलेल्या गुरू आशिष कंस्ट्रक्शन कंपनीला म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने प्रवीण राऊत यांनी एफएसआय घोटाळ्यात मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *