888

अमित शाहचा मुलगा केळी, ठोकळा विकतो काय?

संजय राऊत यांचा किरिट सोमय्यांना सवाल..

मुंबई, दि. ३१ जानेवारी

भाजपाचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह केळी, सफरचंद, ढोकळा विकतो का? आणि किरीट सोमय्यांची मुले चणे-शेंगदाणे विकतात का? असे सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारले आहेत.

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीस परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या गरमागरम चर्चा सुरु आहे.शिवसेनेवर आरोप करत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांची वाईन उद्योगात भागिदारी आहे असा आरोप केला होता. यावर राऊत यांनी सोमय्या यांच्यावर तोफ डागली.

संजय राऊत म्हणाले की, किरीट सोमय्यांची मुलं चणे-शेंगदाणे विकतात का? भाजपा नेत्यांची मुलं केळी विकतात का? अमित शाह यांचा मुलगा केळी, सफरचंद, ढोकळा विकतो का? कुणाची मुलं काय विकतात हा व्यक्तिगत प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या पक्षातील नेत्यांची मुलं वांद्र्याच्या किंवा पेडर रोडच्या रस्त्यांवर स्टॉल टाकणार आहेत का? की डान्सबार टाकणार आहेत नाचवायला?

आमची जर एखादी वायनरी असेल तर ती त्यांनी ताब्यात घ्यावी आणि स्वत: चालवावी. एखाद्या कुटुंबातली कुणी व्यक्ती व्यवसाय करत असेल तर तो काही गुन्हा आहे का? बँकांना लुबाडणे, चोऱ्या-माऱ्या करणे यापेक्षा कष्ट करणे कधीही चांगले पण भाजपाचे थोतांडी लोक जे काही म्हणत आहेत अशा काही वायनरीज आमच्या कुटुंबाच्या असतील तर नक्कीच मी त्यांच्या नावावर करून द्यायला तयार आहे.

कुणाची भागीदारी असेल तरी सरकारने ठरवलेले धोरण त्या विशिष्ट व्यक्तीसाठी आहे का? भाजपाच्या नेत्यांचे किती साखर कारखाने आणि वायनरीज आहेत ते पाहा, असेही संजय राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *