… तर मोहम्मद अली जिनांवर गोळी का झाडली नाही?
… तर मोहम्मद अली जिनांवर गोळी का झाडली नाही?
मुंबई, दि. ३० जानेवारी
नथुराम गोडसे जर खरा हिंदुत्ववादी असता तर मोहम्मद अली जिनाला गोळी मारली असती, गांधींना का गोळी मारली? पाकिस्तानची मागणी तर जिनांनी केली होती. असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊन यांनी विचारला आहे.
आजच्याच दिवशी हिंदुत्ववाद्यांनी गांधीजींची हत्या केली होती या राहुल गांधींच्या ट्वीटवर बोलताना संजय राऊत पुढे म्हणाले की, मर्दानगी होती, तर गांधींना का मारलं, जिनांना का मारलं नाही? वेगळ्या पाकिस्तानची मागणी जिना यांनी केली होती. जर गोळी मारणाला खरा हिंदुत्वावादी होता आणि त्याच्यात हिम्मत होती तर फाळणीला कारणीभूत असलेल्या जिनांवर गोळी झाडायला हवी होती. निशस्त्र गांधींना का गोळी झाडण्यात आली.
गांधींच्या काही भूमिकांवर टीका होऊ शकते. कोणताही राष्ट्रभक्त गांधींवर गोळ्या झाडूच शकत नाही. गांधीजी हे तर फकीर होते. एका निशस्त्र माणसावर गोळी झाडणे, योग्य नव्हते. याचे संपूर्ण जगाला आजही दु:ख आहे. आम्हीही अनेकदा महात्मा गांधी यांच्या भूमिकेवर टीका केली आहे पण महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले होते. त्यांनी भारतीयांमध्ये कायदेभंग, सत्याग्रह आणि अहिसेंच्या माध्यमातून लढण्याचा विश्वास जागृत केला. स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिकारकांचे योगदान आहे. आम्ही नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भगतसिंग यांचे योगदान नाकारत नाही, असेही संजय राऊत म्हणाले.
