किराणा दुकानात वाईनविक्रीचा निर्णय समाज विघातक !
किराणा दुकानात वाईनविक्रीचा निर्णय समाज विघातक !
मुंबई, दि 30 जानेवारी:
किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईनविक्री करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय समाज विघातक खोडसाळ आहे. या निर्णयाचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करीत आहोत असे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे .
किराणा मालाचे दुकान आणि सुपर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गृहिणी महिला विद्यार्थी लहान मुले जात असतात. अशा दुकानांमध्ये जर मद्य विक्री सुरू झाली तर तो राज्य सरकारचा निर्णय समाजासाठी घातक निर्णय ठरेल. त्यामुळे व्यापारी वर्गाने त्यांच्या दुकानात मद्य विक्री करू नये असे आवाहन रिपब्लिकन पक्षातर्फे करीत आहोत. किराणामाल आणि सुपर मार्केटमध्ये मद्य विक्री होत असेल तर अशा दुकानातून जनतेने कोणत्याही वस्तू खरेदी करू नये. मद्यविक्री करणाऱ्या किराणामाल दुकान आणि सुपर मार्केटवर जनतेने बहिष्कार टाकावा.
किराणामाल आणि सुपर मार्केट दुकानात मद्यविक्री करण्याचा राज्य शासनाचा निर्णय अत्यंत खोडसाळ आहे हा निर्णय त्वरित रद्द करावा अन्यथा रिपब्लिकन पक्ष महाविकास आघाडी सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे.
