पुण्यातील शाळा कॉलेज १ फेब्रुवारीपासून सुरु होणार

0
2244

पुण्यातील शाळा कॉलेज १ फेब्रुवारीपासून सुरु होणार.

पुणे, दि. २९ जानेवारी:

पुण्यातील शाळा-महाविद्याले येत्या १ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. परंतु पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग फक्त चार तास भरतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

अजित पवार म्हणाले की, पालकांना विनंती आहे की मुलांना शाळेत पाठवताना आम्ही शाळा-कॉलेज सुरू केले असले तरी अंतिम निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. तुम्ही स्वत: त्यांचे आई-वडिल आहात. आम्ही तिथे सगळ्या नियमांचे पालन करून या गोष्टी करणार आहोत. पहिली ते आठवीपर्यंत ४ तासच शाळा भरवली जाणार आहे. ९ वीपासून पूर्णवेळ शाळा सुरू होतील. मास्क काढूच नये. पुण्यात शाळा आणि महाविद्यालये १ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. राज्यात देखील १ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत.

काही राज्यांत मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढली आहे पण महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. मुंबईत बऱ्यापैकी रुग्णसंख्या कमी झाली असून पुण्यातही दोन दिवस रुग्णसंख्या कमी झाली आहे. ती अजून कमी व्हावी अशी अपेक्षा आहे, असेही अजित पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *