महाराष्ट्रात आता सुपर मार्केट व दुकानातही मिळणार वाईन !

0
wine 12

महाराष्ट्रात आता सुपर मार्केट व दुकानातही मिळणार वाईन !

मुंबई, दि. २८ जानेवारी :

राज्यातील किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्यास परवानगी देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर जे सुपर मार्केट आहेत तेथे एक स्टॉल टाकून वाईन विक्री करता येणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री नवाब मलिक यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली.

नवाब मलिक म्हणाले की, महाराष्ट्रात बऱ्याच वायनरी आहेत त्यामुळे सरकारने नवीन धोरण ठरवून सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. एक हजार स्क्वेअर फुटापर्यंतच्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे. पुढच्या वर्षापर्यंत वाईन उद्योगाचा विस्तार एक हजार कोटी लिटरपर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारने पावले टाकायला सुरुवात केली आहे.

राज्यात दरवर्षी ७० लाख वाईन लिटरची विक्री होते. सरकारच्या या नव्या धोरणामुळे हा आकडा १ हजार कोटी लिटरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. अनेक बेकरी पदार्थांमध्ये वाईनचा उपयोग होत असतो. बहुतेक वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे वाईनचा वापर चवीसाठी केला जात असतो. त्यामुळे दैनंदिन किराणा दुकानात होणाऱ्या वाईनची विक्री ही बीअरच्या धर्तीवर कॅनमधून करण्याची मागणी होत आहे.

राज्याचे वाईन धोरण प्रामुख्याने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना फायदा व्हावा तसेच वाईन उद्योगास चालना मिळावी या हेतुने राबविण्यात येत आहे. वाईन उद्योगास चालना मिळण्यासाठी पर्यायाने शेतकऱ्यास त्याच्या मालास योग्य किंमत मिळण्याच्या दृष्टीने वाईन उद्योगाची वाढ तसेच वाईनचे परिणामकारक विपणन  होणे आवश्यक आहे. राज्यात सध्या फळे, फुले, केळी व मधापासून वाईन उत्पादित करण्यात येते. ज्या वाईनरी वाईन तयार करतात व त्याबाबत विपणन करण्यास असमर्थ आहेत अशा वाईनरींनी उत्पादित केलेली वाईन थेट सूपर मार्केटमध्ये किंवा वॉक इन स्टोअरमध्ये शेल्फ-इन-शॉप या पद्धतीने विक्री करण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास त्याचा फायदा छोट्या वाईनरी घटकांना व पर्यायाने राज्यातील शेतकऱ्यांना मिळू शकेल.

सध्या सूपर मार्केटशी संलग्न बीअर व वाईन विक्रीचा परवाना देण्यात येतो. आता वाईन विक्रीसाठी पूरक म्हणून सूपर मार्केट किंवा वॉक-इन-स्टोअर मध्ये शेल्फ-इन-शॉप ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. यासाठी सूपर मार्केटमध्ये किंवा वॉक इन स्टोअरमध्ये कुलूपबंद करता येईल. अशा कपाटामधून नमूना एफएल-एक्ससी परवानाधारकार. यासाठी किमान 100 चौ. मी. क्षेत्रफळ असणाऱ्या आणि महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, 2017 च्या कलम 6 अन्वये नोंदणीकृत असलेलेच सूपर मार्केट किंवा वॉक इन स्टोअर पात्र ठरणार आहेत. या ठिकाणी 2.25 घन मीटर इतके कमाल आकारमानाचे एकच कुलूपबंद कपाट ठेवता येणार आहे.

या निर्णयानुसार वाईन विक्री करणाऱ्या सूपर  मार्केट आणि स्टोअर्सना देखील शैक्षणिक व धार्मिक स्थळांपासूनच्या अंतराचे निर्बंध लागू राहतील. नमूना ई-4 अनुज्ञप्तीचे 5 हजार इतके वार्षिक अनुज्ञप्ती शुल्क निश्चित करण्यात आले आहे. मात्र,  दारुबंदी लागू असलेल्या जिल्ह्यांमध्ये असे परवाने दिले जाणार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *