सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला न्याय दिला !

0
BJP shelar

सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला न्याय दिला !

सुप्रीम कोर्टाचा फैसला ऐतिहासिक व अंजन टाकणारा..

मुंबई, दि. २८ जानेवारी :

भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा सुप्रीम कोर्टाचा फैसला ऐतिहासिक असून लोकशाहीतला अंजन टाकणारा आहे. महाराष्ट्र सरकारला स्वतःची चूक सुधारण्याची संधी दिली होती. विधिमंडळाने याबाबत योग्य तो निर्णय करावा असे दिशादर्शन कोर्टाने सुनावणीवेळी केले होते पण फक्त शहाण्याला शब्दांचा अर्थ कळतो. ठाकरे सरकारमध्ये अहंकारामुळे शहाणपण गमावलेले आहे. आजच्या ऐतिहासिक निर्णयामुळे ठाकरे सरकारला इजा पोहोचली आहे, असे प्रतिक्रिया भाजपाचे आशिष शेलार यांनी दिली आहे.

शेलार पुढे म्हणाले की, जर आम्ही केलेल्या निलंबन मागे घेण्याच्या अर्जावर अधिवेशन काळात विचार केला गेला असता तर महाराष्ट्राबद्दली ही अवास्तव चर्चा ठाकरे सरकारला रोखता आली असती पण ठाकरे सरकार अहंकाराच्या परमोच्च कोटीला गेले आहे. आम्हाला कोणत्याही व्यवस्था मान्य नाहीत, चौकशीच्या व्यवस्था असतील, देशातल्या किंवा राज्यातल्या प्रथा परंपरा असतील किंवा संविधानिक प्रक्रिया, या कोणत्याही प्रक्रिया आम्हाला मान्यच नाही असे स्वैर सुटलेले हे सरकार आहे.

ज्या ठरावाने भाजप आमदारांचे निलंबन करण्यात आले तो 5 जुलै 2021 चा ठराव सुप्रीम कोर्टाने रद्दबादल केला आहे. ऑपरेटीव्ह ऑर्डरमध्ये कोर्टाने स्पष्ट केले आहे की,  महाराष्ट्रातील आघाडी सरकारने निलंबनाचा घेतलेला निर्णय घटनाबाह्य, बेकायदेशीर आणि तर्कहीन आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला न्याय दिला आहे. या निर्णयाचे एका वाक्यात वर्णन करायचे झाले तर “सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नाही. तीन न्यायाधीशांच्या पीठाने महाविकास आघाडी सरकारचा हुकुमशाही निर्णय रद्द केला आहे असेही शेलार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *