IMG-20220123-WA0031

टेस्टींगसह लसीकरणाचा वेग वाढवावा.

नाशिक, दि. 23 जानेवारी:
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील प्रशासनाने अत्यंत उल्लेखनीय काम केले आहे. तसेच उल्लेखनीय काम सध्या सुरू असलेल्या तिसऱ्या लाटेत प्रशासनाकडून होईल; तिसऱ्या लाटेत धोका कमी असला तरी तरी परिस्थिती अद्यापही कोरोनाशुन्य झालेली नाही, त्यामुळे लसीकरणासह टेस्टींगचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढविण्याचे आवाहन अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोरोना विषयक आढावा बैठकीत अधिकाऱ्यांशी बोलत होते.

भुजबळ म्हणाले, जिल्ह्यातील सुमारे ७ लाख लोक लसीकरणाच्या दुसऱ्या डोसपासून वंचित आहेत. या वंचित नागरीकांना दुसरा डोस देण्यासाठीचे नियोजन प्रशासनाने प्राथमिकतेने करण्याचे आवाहन करून ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातील दोन महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपापल्या कार्यक्षेत्रात लसीकरण व टेस्टींग आठवडाभरात दुपटीने करण्याचे लक्ष्य निश्चित
करावे. जिल्ह्यात सध्या ऑक्सिजन ४०२ मेट्रिक टन इतक्या क्षमतेने पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून रुग्णालयातील उपलब्ध बेडसंख्याही कोरोनाच्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. या प्रशासकीय तयारीचे कौतुक करताना मागच्या दोन लाटांच्या तुलनेत रुग्णालयातून दाखल रूग्णांचे व ऑक्सिजनवर असलेल्या रूग्णांची संख्या कमी असल्याबद्दलही समाधान व्यक्त केले.

शाळा सुरू करण्याचा आग्रह सर्वच पातळीवरून होताना दिसतो आहे, त्यामुळे शासन-प्रशासनावर या आग्रहाला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. परंतु शाळकरी मुले बाधित होणार नाहीत यासासाठीच्या उपाययोजना व खबरदारी ही शासन-प्रशासनाबरोबरच शाळा प्रशासन, पालकांचीही जबाबदारी असून ज्या शाळांमध्ये मुले बाधित होतील तेथे शाळा तात्काळ बंद कराव्यात तसेच पालकांनीही आपल्या पाल्यांमध्ये आजाराची सौम्य व तीव्र लक्षणे आढळल्यास त्यांना शाळेत पाठवू नये. असेही आवाहन या बैठकीत पालकमंत्री भुजबळ यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *