हत्तीच्या पिल्लाचे नाव ‘चंपा’ व माकडाचे ‘चिवा’ ठेवू !

0
4444

हत्तीच्या पिल्लाचे नाव ‘चंपा’ व माकडाचे ‘चिवा’ ठेवू !

मुंबई, दि. २० जानेवारी

राणीच्या बागेतील पेंग्विन व वाघाचे नुकतेच नामकरण करण्यात आले परंतु यावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली आहे. वाघ यांच्या टीकेला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही प्रत्युत्तर देत पुढच्या वेळी हत्तीच्या पिल्लाचे नाव चंपा आणि माकडाच्या पिल्लाचे नाव चिवा ठेवू, असा पेडणेकर म्हणाल्या.

महापौर पेडणेकर म्हणाल्या, मराठी नावं ठेवायला हवी असे भाजपा म्हणत आहे ना तर मग पुढच्यावेळी चंपा आणि चिवा ही नावं ठेवू. हत्तीच्या पिल्लाचे नाव चंपा ठेवू आणि एक माकडाचे पिल्लू येणार आहे त्याचे चिवा ठेवू. आमच्या मध्यमवर्गीय माणसांना परदेशासारख्या वातावरणाचा अनुभव घेऊ द्या ना, यांची नक्की पोटदुखी काय आहे? तुम्हाला ऑस्कर पुरस्कार चालतो मग ऑस्कर नाव का नाही? असा सावलही पेडणेकर यांनी केला.

साहेबांनी मराठी पाट्या लावायला सांगितल्या आहेत, मराठी नामकरण करण्यास नाही”, असे ट्विट करत चित्रा वाघ यांनी शिवसेनेला डिवचले होते. त्याचा समाचार  महापौर यांनी घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *