‘एलोन मस्क’ यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी !
‘एलोन मस्क’ यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी !
मुंबई, दि. १६ जानेवारी :
जागतिक दर्जाचे उद्योगपती एलोन मस्क यांनी भारतात गुंतवणुकीसाठी सरकारी अडथळे येत असल्याचे वक्तव्य केले होते . या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एलोन मस्क यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे.
सुप्रसिद्ध टेस्ला कारचे मालक एलोन मस्क यांना महाराष्ट्रात येण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटरवरुन जाहीर आमंत्रण दिले आहे. टेस्ला कारचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट तुम्ही महाराष्ट्रात बनवू शकता असं जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
सुप्रसिद्ध टेस्ला कारचं लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आकर्षण आहे. ही कार भारतात कधी लाँच करणार असा प्रश्न ट्विटरवरील एका युजरने एलोन मस्कला विचारला त्यावर काही शासकीय नियमांच्या अडचणींचा सामना करत असल्याचे मस्क याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्र एक प्रगत राज्य आहे, तुमच्या उभारणीसाठी तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल. सुप्रसिद्ध टेस्ला कारचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट तुम्ही महाराष्ट्रात बनवू शकता असं म्हणत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एलोन मस्कला महाराष्ट्रात आमंत्रित केले आहे.
