विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांना जोरदार धक्का !
विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांना जोरदार धक्का !
मुंबई, दि. १३ जानेवारी:
विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना जोरदार धक्का बसला आहे. मुंबै बँकेवरचे त्यांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. भाजपा उमेदवार प्रसाद लाड यांचा पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे हे मुंबै बँकेचे अध्यक्षपदी विजय झाले.
मुंबै बँकेच्या निवडणुकीसीठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची बैठक झाली. यावेळी बँकेतील प्रतिनिधी देखील होते. या बैठकीमध्ये युतीची घोषणा करण्यात आली. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या एकत्रित मिळून ११ जागा झाल्या, तर भाजपाकडे अवघ्या ९ जागा शिल्लक राहिल्या. त्यामुळे दोन मतांनी प्रसाद लाड यांचा पराभव झाला.
भाजप आणि दरेकरांसाठी हा मोठा धक्का आहे. या घडामोडीत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे समजते. ची मोठी खेळी असल्याचं सांगितलं जात आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यामुळे ११ संचालक सदस्य संख्या झाली. तर भाजपकडे ९ संचालक संख्या होती. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पारड्यात जास्त मत मिळाली. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे दरेकरांचा पराभव अटळ झाला होता. त्यामुळे पराभव दिसताच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. भाजपने अचानक त्यांचा उमेदवार बदलून प्रसाद लाड यांना अध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली होती.
