कोरोना निर्बंध लागू, दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी

0
IMG_20210610_194521

कोरोना निर्बंध लागू, दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी

लग्नाला 50 तर अंत्यविधीसाठी फक्त 20 लोकांनाच परवानगी…

मुंबई, दि. 9 जानेवारी :

कोविडच्या वाढत्या प्रकारामुळे राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पाच किंवा त्याहून जास्त लोकांला बाहेर फिरण्यासाठी पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत बंदी. पाच किंवा त्याहून जास्त लोकांच्या समूहाला अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरण्यासाठी रात्री 11 पर्यंत ते पहाटे 5 वाजेपर्यंत बंदी. 10 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून लागू होतील.

लग्नसमारंभाठी कमाल 50 व्यक्ती, अंत्यविधीसाठी कमाल 20 व्यक्ती , सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमात कमाल 50 व्यक्तींना परवानगी असेल. शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस 15 फेब्रुवारी पर्यंत बंद राहतील. स्वीमिंग पूल, जिम, स्पा, वेलनेस सेंटर्स आणि ब्यूटी सलून्सबंद राहतील. हेअर कटींग सलून 50 टक्के क्षमतेनं चालू राहतील व रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहतील.एन्टरटेनमेंट पार्क, प्राणिसंग्रहालये, वस्तू संग्रहालये, किल्ले बंद राहतील. रेस्टॉरंट्स, उपाहारगृहे 50 टक्के क्षमतेनं चालू राहतील. दररोज होम डिलीव्हरीला परवानगी राहील.

वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देत कार्यालयीन वेळेत कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे तसेच गरजेनुसार कार्यालयीन कामकाजाच्या वेळांमध्ये बदल करणे. याकरिता कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या वेळांमध्ये बदलाचाही विचार करू शकतील.

खासगी व्यवस्थापनाने वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देत कामकाजाच्या वेळा कमी कराव्यात. कार्यालयात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित राहणार नाहीत, याचीही दक्षता घ्यावी तसेच कर्मचाऱ्यांसाठी वेळांमध्ये बदल करण्याचाही विचार करतील. तसेच कार्यालये 24 तास सुरू ठेवून टप्प्याटप्प्याने काम करण्याबाबतही विचार करावा.

कार्यालयीन कामकाजाच्या वेळा असामान्य असतील आणि त्यासाठी प्रवास करणे अत्यावश्यक असेल तर अत्यावश्यक कामासाठी ओळखपत्र दाखवून परवानगी मिळवता येऊ शकेल. अशाप्रकारचा निर्णय घेताना महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि सोयीचा विचार करणे बंधनकारक राहील.

लसीकरण पूर्ण केलेले कर्मचारीच कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील. लसीकरण पूर्ण न झालेल्या कर्मचाऱ्यांना लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन द्यायलाच हवे.कार्यालय व्यवस्थापनाने सर्व कर्मचारी सर्वकाळ कोविडरोधी वागणुकीचे तंतोतंत पालन करतील याची दक्षता घ्यावी.

कोविड विरोधी दोन लशी किंवा राज्यात प्रवेश करण्याआधी 72 तासांपूर्वीपर्यंत आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल ग्राह्य धरण्यात येईल. हे हवाई, रेल्वे आणि रस्ते या तिन्ही मार्गांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लागू राहील. प्रवास करणारे वाहनचालक, वाहक आणि अन्य सहयोगी कर्मचाऱ्यांनाही हे लागू राहील. कार्गो ट्रान्स्पोर्ट, औद्योगिक कामकाज, इमारतींचे बांधकाम लसीकरण पूर्ण केलेल्या व्यक्तींकडून सुरू राहील.

दुकाने, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स तसेच ई-कॉमर्स किंवा होम डिलीव्हरी करणाऱ्या आस्थापनेतील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक राहील. यासाठी व्यवस्थापनाला जबाबदार धरण्यात येईल आणि यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता न केल्याचे आढळल्यास सदर आस्थापना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून बंद करण्यात येईल. या कामात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांची नियमित वेळानंतर सदर आस्थापनेने आरएटी चाचणी करून घेणे गरजेचे आहे.

कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांमध्ये स्वतंत्रपणे वाढीव बंधनेही लागू करता येऊ शकतील. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या बंधनांमध्ये बदल करण्याबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सुचवू शकेल. असे बदल राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीनेच लागू करण्यात येतील.

कोव्हिड व्यवस्थापनाच्या कामासाठी राज्य सरकारची कार्यालये, किंवा राज्य सरकारद्वारे अर्थसहाय्यित अन्य संस्थांचे कर्मचारी आणि संसाधने यांची मागणी करण्याचे संपूर्ण अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला राहतील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *