उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणूक जाहीर !
उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणूक जाहीर !
१० फेब्रुवारी ते ७ मार्च मतदान, १० मार्चला मतमोजणी.
नवी दिल्ली, दि. ८ जानेवारी:
उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर आहे. उत्तर प्रदेशात सात टप्प्यात मतदान होणार आहे तर पंजाब, उत्तराखंड आणि गोवा येथील सर्व जागांसाठी १४ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे तर मणिपूरमध्ये २७ फेब्रुवारी आणि ३ मार्च असे दोन टप्प्यांत मतदान होणार आहे.
उत्तर प्रदेशात १० फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान सात टप्प्यांत मतदान होणार आहे. तर मतमोजणी १० मार्च रोजी होत आहे.
निवडणूक होत असलेल्या पाचही राज्यांत तत्काळ प्रभावाने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. कोविड स्थिती लक्षात घेत आयोगाने कठोर नियम लावले आहेत. त्यानुसार रोड शो, पदयात्रा, सायकल यात्रा यांना मनाई करण्यात आली आहे. १५ जानेवारीपर्यंत जाहीर सभांवरही निर्बंध आणले गेले आहेत. घरोघरी जाऊन प्रचार करण्यास परवानगी असेल मात्र केवळ पाचच जण प्रचार करू शकतील.
कोविड स्थितीमुळे मतदानावर परिणाम होऊ नये म्हणून मतदानासाठी एक तास अधिक कालावधी देण्यात येणार आहे. सर्व निवडणूक कर्मचारी लसीकरण झालेले असतील. मतदान केंद्रांवर मास्क आणि सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात येईल
