नारायण राणेंना नोटीस बजावणा-या पोलिसांवर कारवाई करा !

0
IMG_20211202_192958

नारायण राणेंना नोटीस बजावणा-या पोलिसांवर कारवाई करा !

मुंबई, दि. ३० डिसेंबर :
आमदार नितेश राणे प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलीस स्टेशनला साक्षीसाठी बोलावण्यावरून भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. नारायण राणे यांना नोटीस देऊन ठाण्यात साक्षीसाठी बोलावणे हा कायदेशीर अपराध आहे. त्यामुळे आता त्या पोलिस अधिकाऱ्यांवर IPC 166A अंतर्गत एफआयआर नोंदविला जावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

फडणवीस म्हणाले की, CRPC 160 ची नोटीस देणारे पोलिस जाणीवपूर्वक हे विसरले की 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलिस स्टेशनमध्ये साक्षीसाठी बोलविताच येत नाही. त्यांची साक्ष घरी जाऊनच घ्यावी लागते. त्यामुळे त्या पोलीसांवर कारवाई केली पाहिजे आणि असे न केल्यास भाजपा CRPC 156(3) अंतर्गत खटला दाखल करेल. हे जर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशाने केले असेल तर त्यांच्यावर सुद्धा IPC 34 अन्वये सहआरोपी बनविण्याची मागणी भाजपा करेल असेही फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *