गोवा निवडणुकीत रिपाइंचा भाजपला पाठिंबा !

0
IMG-20211230-WA0000

गोवा निवडणुकीत रिपाइंचा भाजपला पाठिंबा !

मुंबई दि. 30 डिसेंबर:
गोवा विधानसभेची आगामी निवडणूकीत विधानसभेच्या सर्व 40 जागांवर रिपब्लिकन पक्षाचा भाजप ला जाहीर पाठिंबा देत असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

पणजी येथे भाजप- आरपीआयची संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा रामदास आठवले यांनी केली.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी गोव्याचा विकास केला आहे. सर्वांना सोबत घेऊन ते काम करीत आहेत. सामाजिक न्याय खाते स्वतःकडे असणारे देशातील एकमेव मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आहेत. गोव्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन उभारण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष एकही जागा न लढवता सर्व 40 जागांवर भाजपला पाठिंबा राहणार आहे. गोव्यात भाजप रिपाइंचे सरकार निश्चित येईल. त्यात रिपाइंला सत्तेचा वाटा देण्यात येईल असे आश्वासन भाजपतर्फे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप चांगले काम केले आहे. अनेक योजना राबविल्या आहेत. देशभरातील दलित जनता भाजप सोबत आहे.त्यामुळे 2014 मध्ये भाजप ला 284 आणि 2019 मध्ये भाजपला 303 जागा मिळाल्या आहेत असे ना रामदास आठवले यांनी सांगितले. गोव्यात ममता बॅनर्जी किंवा अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचे काही चालणार नाही. भाजप आणि आरपीआय युतीचा विजय निश्चित होईल. 5 राज्यांच्या निवडणुकीत भाजप सोबत आरपीआयची युती होण्याबाबत उत्तर प्रदेश, मणिपूर, पंजाब, उत्तरा खंड आदी राज्यांत बोलणी सुरू असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांची गोवा विधानसभा निवडणूकीबाबत भाजप आणि रिपाइं शिष्टमंडळासोबत चर्चा झाली. यावेळी भाजपचे प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे, रिपाइंचे राष्ट्रीय सचिव बाळासाहेब बनसोडे, रिपाइंचे गोवा प्रदेश अध्यक्ष सतीश तानावडे, रिपाइंचे एस युवराज, घनश्याम चिरणकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *