… राज्य सरकारही राज्यपालांवर नाराज !
… राज्य सरकारही राज्यपालांवर नाराज !
संघर्ष टोकाला जाऊ शकत होता पण सरकारने संयम बाळगला..
मुंबई, दि. २९ डिसेंबर :
राज्यपाल व ठाकरे सरकार यांच्यातला वाद पुन्हा उफाळून आला असून आता निमित्त ठरले आहे ते विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक. राज्यपालांनी या निवडणुकीवर आक्षेप घेतल्याने ही निवडणूक होऊ शकले नाही. यावरून राज्य सरकारच्या पत्रावर राज्यपाल यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर सरकारही राज्यपालांवर नाराज आहे असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
पत्रकारांशी बोलताना सुभाष देसाई म्हणाले की, ज्या प्रकारचे सहकार्य राजभवनकडून मिळायला हवे तसे मिळत नाही. सर्वसामान्यपणे राज्यपाल हे राज्य सरकारच्या सल्ल्याप्रमाणे निर्णय घेतात. सल्ला देणे हे राज्य सरकारचे काम आहे. त्यांच्या निर्णयासंदर्भात विनंती केली जाते. राज्यपालांनी निवडणुकीला परवानगी नाकारल्यानंतर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हा संघर्ष टोकाला जाऊ शकला असता.
राज्यपालपदाचा अवमान होऊ नये याची पूरेपूर काळजी सरकारमधल्या मंडळींनी घेतली. काल संघर्ष टोकाला जाऊ शकत होता पण संयम बाळगून महाविकास आघाडीने थांबायचे ठरवले. राज्यपाल जेव्हा राजी होतील आणि अनुमती देतील तेव्हा अध्यक्षपदाची निवडणूक होईल, असे सुभाष देसाई म्हणाले.
