तुम्ही, पत्रात वापरलेली भाषा असह्य आणि धमकीवजा !

0
CM 777

तुम्ही, पत्रात वापरलेली भाषा असह्य आणि धमकीवजा !

राज्यपाल कोश्यारी यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र..

मुंबई, दि. २९ डिसेंबर:

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राज्यपाल व ठाकरे सरकार यांच्यात उद्धवलेला वाद अजून संपलेला नाही. अधिवेशन संपले असले तरी राज्यपाल यांनी मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठवलेल्या पत्रावर तीव्र नाराजी व्यक्त करत,घटनाविरोधी गोष्टीला परवानगी देण्यासाठी आपल्यावर दबाव टाकता येणार नाही. पत्रात वापरलेली भाषा असह्य आणि धमकीवजा होती असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्रात म्हटले आहे.

राज्यपालांच्या या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, “मी कधीही सभागृहांचे अधिकार किंवा त्यांची कार्यपद्धती यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाहीत. पण घटनेच्या कलम २०८ नुसार जी प्रक्रिया घटनाविरोधी दिसत आहे तिला परवानगी देण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जाऊ शकत नाही. तुम्ही पत्रात वापरलेली भाषा असह्य आणि धमकीवजा होती. यामुळे सर्वोच्च घटनात्मक कार्यालय असलेल्या राज्यपालांच्या कार्यालयाचा अपमान झाला असून त्याची प्रतिमा मलीन झाली आहे.”

तुम्ही नियम बनवताना घटनेच्या कलम २०८ चा आधार दिला आहे. पण त्याच कलमात हेही म्हटले आहे की घटनेतील तरतुदींचं पालन करूनच राज्य सरकार नियमांमध्ये बदल करू शकते. मी राज्यघटनेचे रक्षण करण्याची शपथ कलम १५९ नुसार घेतली आहे. त्यामुळे नियमांमध्ये सुधारणा करून या निवडणुका घेण्याची ही पद्धत प्रथमदर्शनी घटनाविरोधी वाटत असताना त्याला सध्या तरी परवानगी देता येणार नाही”

“विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी तुम्ही ११ महिने घेतले. त्यासाठी महाराष्ट्र विधिमंडळ नियम ६ आणि ७ यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले हेही इथे नमूद करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या बदलांचा कायदेशीरदृष्ट्या अभ्यास करणे महत्त्वाचे आहे”, असेही या पत्रात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *