लालबागचा राजाच्या आरोग्योत्सवाचे उदघाटन!

0
IMG-20200803-WA0024

मुंबई दि.4 ऑगस्ट

देशावर आलेल्या कोरोना संकटाशी मुकाबला करण्यासाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा श्रींची प्रतिष्ठापना न करता लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दी महोत्सवाचे औचित्य साधत आरोग्योत्सव व प्लाझ्मादान शिबिराचे आयोजन केले.या अतिशय स्तुत्य उपक्रमाचे उदघाटन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले.

तसेच महाराष्ट्रातील ९२ शहीद पोलिस कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश देण्याचे काम मंडळाने हाती घेतले आहे. याची सुरुवातही आज शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आली.

त्याचबरोबर गलवान खोऱ्यात भारत-चीन सीमेवर लढताना वीरगती मिळालेले जवान सचिन मोरे व पुलवामामध्ये शहीद झालेले जवान सुनील काळे यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचा धनादेश सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आला.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सवाने या उपक्रमांद्वारे अतिशय चांगला आदर्श सर्वांपुढे ठेवला आहे.त्याबद्दल मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे शरद पवार यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *