राज्यपाल महोदय, इतका अभ्यास बरा नव्हे !

0
Sanjay-Raut-89

राज्यपाल महोदय, इतका अभ्यास बरा नव्हे !

मुंबई, दि. २८ डिसेंबर :

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन राजभव व ठाकरे सरकार आमने सामने आलेत. राज्यपालांनी अध्यक्षपद निवडणुकीवरून सरकारला सुनावले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपाल यांना पत्र पाठवून विधिमंडळाच्या कायद्यांची आठवण करुन दिली. यावरून सुरु झालेल्या वादात शिवसेना खासदाप संजय राऊत यांना राज्यपाल यांना इतका अभ्यास बरा नाही असा टोला मारला आहे.

संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठवलेले उत्तर तुमच्यासमोर आहे. राज्यपालांनी इतका अभ्यास करु नये असे मी म्हणालो होतो. घटनेमध्ये ज्या तरतुदी आहेत त्यानुसार काम करण्यासाठी राज्यपालांची नेमणुक होते.विधानसभेचे हक्क, सरकारच्या शिफारसी, लोकभावना डावलून काम करण्यासाठी राज्यपालांची नियुक्ती होत नाही. राज्यपाल अभ्यासू, विद्वान आहेत. पण त्या अभ्यासाचे आणि विद्वत्तेचे अजीर्ण होऊ नये. महाराष्ट्राच्या राजभवनामध्ये अभ्यासाचे अजीर्ण झाले आहे. अजीर्ण झाल्यावर पोटाचा त्रास सुरु होतो. असा त्रास जर काही लोकांना झाला असेल महाराष्ट्राचे आरोग्य खाते सक्षम आहे. ते उपचार करतील.

राज्यपाल जर घटनेच्याविरुद्ध वागत असतील किंवा अशा प्रकराचे राजकीय वर्तन करावे असा दबाव असेल तर सरकारलासुद्धा राजकीय पावलेच टाकावी लागतील. असेही संजय राऊत म्हणाले.

आपले राज्यपाल फार अभ्यासू असून इतका अभ्यास बरा नाही. हे अभ्यासाचे ओझे झेपले पाहिजे. एकतर मुळात लॉकडाउनमध्ये अभ्यास कमी झाला आहे, त्यात तुम्ही असा प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करु लागलात. घटनेत काही गोष्टी स्पष्ट लिहिल्या असून त्यानुसार काम करायचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *