66

संस्था उभ्या करायला अक्कल लागते !

नारायण राणेंचे नाव न घेता अजित पवारांचा हल्लाबोल

सिंधुदुर्ग, दि. २७ डिसेंबर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकणातील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. संस्था उभ्या करायला अक्कल लागते मात्र संस्था अडचणीत आणायला अक्कल लागत नाही असा टोला मारला.

रत्नागिरीच्या प्रचारसभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, सिंधुदुर्गच्या जिल्हा बँकेच्या प्रतिनिधींना, मतदारांना मला सांगायचे आहे की, बाबांनो फार विचार करून मतदान करा. संस्था उभ्या करायला डोकं लागतं, अक्कल लागते. मात्र संस्था अडचणीत आणायला डोकं, अक्कल लागत नाही. सर्वांनी निर्धाराने मतदान करा,कुणाच्याही दबावाला, दहशतीला बळी पडण्याचे अजिबात कारण नाही.येथे कशाप्रकारे काही घटना घडल्या याचा इतिहास तुम्हा सर्वांच्या समोर आहे. म्हणून मतदारांनी गाफील राहू नये.

काही महाभागांनी कर्ज कसं मिळवलं, कसं थकवलं हे पाहा. खासदार आमदार होणे सोपे आहे पण जिल्हा बँकेवर निवडून येणे अवघड आहे. कारण पार्टी तिथे कार्यकर्ता याप्रमाणे पक्षाचा कार्यकर्ता तिथे मजबुतीने काम करत असेल तर आमदार खासदार निवडून येतो. येथे मात्र वेगळ्या पद्धतीने निवडणूक लढली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *