सिद्धिविनायकाला ‘आटपाडी’च्या डाळिंबाची आरास !
सिद्धिविनायकाला ‘आटपाडी’च्या डाळिंबाची आरास !
मुंबई, दि. 26 डिसेंबर:
आटपाडी गावचे सुपुत्र कुशल शेतकरी उद्योजक श्री. सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे विश्वस्त राजाराम देशमुख यांच्या डाळिंब्याच्या बागेतील पहिली डाळिंब खेप श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पा चरणी अर्पण करून बाप्पाला त्या डाळिंबाची आरास करून सजवण्यात आले.

शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे, त्यांनी पिकवलेल्या पिकांना योग्य भाव मिळू दे व सर्व संकटांपासून शेतक-याचं संरक्षण कर, असं साकडं राजाराम देशमुख यांनी बाप्पाला घातलं.
