लसींचे दोन डोस घेतलेल्यांनाही ओमायक्रॉनची लागण !
लसींचे दोन डोस घेतलेल्यांनाही ओमायक्रॉनची लागण !
नवी दिल्ली, दि. २६ डिसेंबर:
कोरोनाचे संकट संपत असल्याचे दिलासादायक चित्र देशभरात असतानाच ओमायक्रॉन या कोरोनाच्या विषाणूने शिरकाव केला आहे. ओयक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परंतु या सर्वात चिंतेची बाब समोर आली असून ज्या लोकांना ओमयक्रॉनची लागण झाली आहे त्यातील ५० लोकांनी लसीचे दोन डोस घेतलेले आहेत.
ओमायक्रॉनची लागण झालेल्या १८३ रुग्णांचे विश्लेषण केल्यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे ५० टक्के म्हणजे ८७ रुग्णांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर त्यातील तीन जणांनी बूस्टर डोसही घेतला आहे, असे असतानाही त्यांना नव्या विषाणुची लागण झाली. यातील १२१ लोकांनी परदेश प्रवास केला आहे पण २७ टक्के लोकांनी परदेश प्रवासही केलेला नाही. देशातील १७ राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. तर महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सर्वात जास्त १०८ रुग्ण आहेत.
ओमायक्रॉनला थांबवण्यासाठी लस पुरेशी नाही तर मास्क आणि कोरोना नियमांचे पालन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे असे तज्ञांनी सांगितले आहे.
