हेमा मालिनींच्या गालांवरून पुन्हा एक वाद !
हेमा मालिनींच्या गालांवरून पुन्हा एक वाद !
जळगाव, दि. २० डिसेंबर
लाखो दिलों की धडकन ‘ड्रिम गर्ल’ हेमामालीनी यांची भूरळ पडली नाही असा शोधूनही सापडणारा नाही. वयाच्या साठीतही हेमामालीनी नव्या दमाच्या अभिनेत्रींना कॉम्पलेक्स देतात. सौंदर्याची खाण असलेल्या हेमामालीनींचे गाल हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक नेत्यांनी आपल्या भागातील रस्त्यांची तुलना हेमामालिनींच्या गालाशी केली आहे. यात भर पडली आहे ती शिवसेनेचे नेते व मंत्री गुलाबराव पाटील यांची. जळगावातील रस्त्यांची तुलना त्यांनी हेमामालिनींच्या गालाशी केली आणि वाद ओढवून घेतला..
गुलाबराव पाटील असे म्हणाले की, ‘माझ्या धरणगावला या आणि तिथले रस्ते पाहा. सगळे रोड-रस्ते अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालासारखे आहेत. जर रस्ते तसे नसतील तर राजीनामा देऊन टाकेन’.
नगरपंचायत निवडणुक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात गुलाबराव पाटलांनी हे विधान करून धुरळाच उडवून दिला.
गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर हेमा मालिनी म्हणाल्या, “माझे गाल आणि रस्त्यांची तुलना करण्याचा ट्रेंड काही वर्षांपूर्वी लालूजींनी सुरू केला होता. तो आजही सुरू आहे. त्यानंतर सर्वजण असे बोलू लागले. एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीने असे वक्तव्य केले तर हरकत नाही पण खासदार किंवा आमदाराने अशाप्रकारे बोलणे योग्य नाही.”
चित्रा वाघ, रुपाली चाकणकर यांनी गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर आक्षेपही घेतला शेवटी गुलाबराव पाटील यांनी जाहीर माफी मागत म्हणाले, जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील एका कार्यक्रमात मी रस्त्यांबाबत वक्तव्य केले होते. चांगले रस्ते असावेत अशी अपेक्षा त्यामागे होती. परंतु माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. हेमा मालिनी यांच्याबद्दल आपल्या मनात नेहमीच आदर आहे तसेच महिलांविषयीही आपल्या मनात नेहमी आदराचीच भावना आहे.
