वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा !

0
FB_IMG_1634747954782

वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा !
काँग्रेस नेते व मंत्री अशोक चव्हाणांच्या प्रयत्नांना मोठे यश.

मुंबई, दि. 18 डिसेंबर:
कोरोना काळात शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ न शकल्यामुळे अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडून आता त्यांना शासकीय सेवेची दारे बंद होतील की काय अशी भीती निर्माण झाली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहानुभूतीपूर्वक यावर विचार करून कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून स्पर्धा परीक्षांना बसण्यास मान्यता दिली आहे. सामान्य प्रशासन विभागाने याचा शासन निर्णय
काढला आहे.

कोरोना काळात नोकरभरतीच्या जाहिराती प्रसिद्ध न झाल्यामुळे वयोमर्यादा ओलांडणाऱ्या हजारो उमेदवारांची संधी संपली होती. अशा विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, यासाठी १३ ऑक्टोबर रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरळ सेवा भरतीची वयोमर्यादा तात्पुरत्या स्वरूपात वाढवून देण्याची मागणी अशोक चव्हाण यांनी केली होती.

१० नोव्हेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला व तसा शासननिर्णयही आता निर्गमित झाला आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व संपूर्ण मंत्रिमंडळाचा आभारी आहे असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *