पेपरफुटी प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपेंना अटक

0
pune police

पेपरफुटी प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपेंना अटक !

मुंबई, दि. १७ डिसेंबर:

राज्यात पेपर फुटीचे प्रकरण गाजत असून या पेपरफुटी प्रकरणात राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी अटक केली आहे. आरोग्य विभागाच्या पेपरफुटीचा तपास करीत असताना सायबर पोलिसांना म्हाडाच्या पेपरबाबतची माहिती मिळाली. म्हाडा परीक्षेचा पेपर फुटताना जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा डॉ. प्रीतीश देशमुखासह आणखी दोघांनाही सायबर पोलिसांनी अटक केल्याची माहिती, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.

पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता माहिती देताना पुढे म्हणाले की, शिक्षक भरती परीक्षा झाल्यानंतर रिचेकिंग वेळी गैरप्रकार होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून ८८ लाख रुपयांची रोख ताब्यात घेण्यात आले आहेत. उमेदवारांकडून ३५ हजार ते एक लाख रुपये पर्यंत पैसे घेतले जात होते. आतापर्यंत जवळपास साडेचार कोटी रुपये गोळा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सुरुवातीला दोन पेपरफुटीची प्रकरणे हाताळत होतो. यात आरोग्य भरती परीक्षा आणि म्हाडा परीक्षेचा समावेश आहे. आरोग्य भरती परीक्षा घोटाळ्याचा तपास करत असताना म्हाडा परीक्षा गैरव्यवहाराची माहिती हाती लागली आणि म्हाडा परीक्षेच्या आदल्या रात्री काही आरोपींना अटक केली. तो तपास सुरू असताना शिक्षक पात्रता परीक्षेच्या गैरव्यवहाराची माहिती हाती लागली. टीईटी परीक्षेतील गैरव्यवहाराबाबत दोघांना अटक केली आहे. यात परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि आणखी एकाचा समावेश आहे

या उमेदवारांकडून पूर्व परीक्षेसाठी ३५ हजार ते १ लाख रुपये घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे. २०२० च्या जानेवारीत झालेल्या टीईटी परीक्षेवेळचा हा गैरव्यवहार आहे. म्हाडा परीक्षेच्या आदल्या दिवशी पेपरफुटी होणार असल्याच्या संशयावरून पोलिसांनी छापे घातले आणि तपास केला त्यात टीईटी परीक्षेसंदर्भातल्या गैरव्यवहाराचे धागेदोरे पुढे आलेत असेही पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *