ओबीसी आरक्षण जात असताना भुजबळ, वडेट्टीवार मंत्री कसे राहू शकतात?

0
bjp shelar

ओबीसी आरक्षण जात असताना भुजबळ, वडेट्टीवार मंत्री कसे राहू शकतात?

मुंबई, दि. १७ डिसेंबर :

ठाकरे सरकारने दृष्टीहिन, बुध्दीाहिन आणि दिशाहिन भूमिका घेतल्याने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा खून केला. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण जात असताना छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार मंत्रीमंडळात कसे राहू शकतात? असा सवाल भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

ओबीसीच्या राजकीय आरक्षणावर भाजपाची भूमिका मांडताना आशिष शेलार पुढे म्हाणाले की, ठाकरे सरकारच्या हेकेखोरपणामुळे स्थाानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे २७ टक्के आरक्षणाचा खून झाला आहे. ज्या पध्दतीने २०१९ ला सर्वोच्च न्यायालयाच्या  खंडपीठाने निवडा दिला त्या‍मध्ये ट्रिपल टेस्टमध्ये खरा ठरणारा इंपेरिकल डाटा गोळा करा, एवढाच निवाडा न्यायालयाने दिला होता. त्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ ला सांगितले की,  मागासवर्ग आयोग नेमा, इंपेरिकल डाटा गोळा करा पण ठाकरे सरकारने काय केले तर इंपेरिकल डाटा केंद्र सरकारने द्यावा, जनगणननेची आकडेवारी केंद्र सरकारने द्यावी, कोरोना साथीच्या काळात आम्हाला इंपेरिकल डाटा गोळा करणे शक्य नाही असेच ठाकरे सरकार वारंवार सांगत राहिले.

ओबीसी समाजाचे मागासलेपण सिध्द करणारी इंपेरिकल डाटा आणि जनगणनेची आकडेवारी यामध्ये फरक आहे. पण आंब्याच्या झाडासमोर उभे राहुन चिंचा द्या, अशी मागणी करण्यारसारखे आहे. छगन भुजबळ, विजय वड्डेटृटीवार, नाना पटोले यांनी एवढे दिवस आंब्याच्या झाडासमोर उभे राहून चिंचेचीच मागणी करीत राहिले. स्वतःचे नाकर्तेपण दुस-यावर आरोप करून झाकले जात नाही असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *