प्रदेश काँग्रेस मुख्यालयात ५० वा ‘विजय दिवस’ साजरा!
प्रदेश काँग्रेस मुख्यालयात ५० वा ‘विजय दिवस’ साजरा!
मुंबई, दि. १७ डिसेंबर:
स्व. पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या कणखर व दूरदृष्टी नेत्वृत्वाखाली भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला अद्दल घडवत जगाच्या नकाशावर बांग्लादेशची निर्मिती केली. पाकिस्तानविरोधातील १९७१ च्या युद्धात अवघ्या १३ दिवसात भारतीय जवानांनी पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले. तो १६ डिसेंबरचा दिवस ऐतिहासिक दिवस दरवर्षी ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य कार्यालय टिळक भवन, दादर येथे ५० वा विजय दिवस साजरा करण्यात आला. या युद्धात शहीद झालेल्या जवानांना पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या शौर्याला अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रदेश काँग्रेसचे खजिनदार डॉ. अमरजितसिंह मनहास, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, मुनाफ हकीम, राजेश शर्मा, प्रदेश सचिव डॉ. यावर अली शेख, गजानन देसाई, रमेश श्रीखंडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रदेश काँग्रेसच्या वतीने ‘विजय दिवस’ राज्यभर विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
