‘दिव्य काशी, भव्य काशी’ निमित्त राज्यात दोन हजार ठिकाणी कार्यक्रम

0
IMG-20211213-WA0036

‘दिव्य काशी, भव्य काशी’ निमित्त राज्यात दोन हजार ठिकाणी कार्यक्रम.

मुंबई, दि. 13 डिसेंबर :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथील विकास कामांच्या लोकार्पणानिमित्ताने राज्यात दोन हजारांवर ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. वाराणसी येथील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण तसेच धार्मिक विधी, संत, साधू महंतांचा सन्मान करत ‘भव्य काशी, दिव्य काशी’ कार्यक्रम राज्यभर मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री गिरीश महाजन आदी सहभागी झाले होते.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, मुंबई अध्यक्ष आ.मंगलप्रभात लोढा, प्रदेश उपाध्यक्ष कृपाशंकर सिंग हे मुंबईत बाबुलनाथ मंदिरात झालेल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे पुणे येथे, प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूर येथे, सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर येथे तर प्रदेश सरचिटणीस आ.अतुल सावे हे औरंगाबाद येथे झालेल्या कार्यक्रमांत सहभागी झाले होते. विविध धार्मिक ठिकाणी तसेच पक्ष कार्यालयांत मोठ्या पडद्यावरून वाराणसी येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

त्र्यंबकेश्वर, औंढा नागनाथ, भीमाशंकर आदी ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी धार्मिक विधींसह विविध कार्यक्रम झाले. त्र्यंबकेश्वर येथील कार्यक्रमात ज्येष्ठ नेते गिरीश महाजन, आ. राहुल आहेर, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, माजी आमदार नरेंद्र पवार यांनी भाग घेतला. औंढा नागनाथ येथे आ. तान्हाजीराव मुटकुळे, भीमाशंकर येथे महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी या कार्यक्रमात भाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *