भारताची हरनाज संधू ठरली ‘मिस युनिवर्स २०२१’!
भारताची हरनाज संधू ठरली ‘मिस युनिवर्स २०२१’!
नवी दिल्ली, १३ डिसेंबर:
भारताची हरनाज संधू ‘मिस युनिवर्स 2021’ ठरली आहे. इस्रायलमध्ये पार पडलेल्या या सौंदर्य स्पर्धेत हरनाजने हा किताब मिळवला. तब्बल २१ वर्षांनंतर भारताला मिस युनिव्हर्सचा किताब पुन्हा मिळाला आहे. लारा दत्त व सुश्मिता सेन या दोघांनी याआधी हा किताब जिंकला होता.
पराग्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या सौंदर्यवतींना हरनाजने मागे टाकत ही स्पर्धा जिंकली. हरनाजला २०२० ची मिस युनिव्हर्स मेक्सिकोची अँड्रिया मेझा हिने मुकूट परिधान केला. या स्पर्धेत पराग्वे आणि दक्षिण आफ्रिकेची स्पर्धक फर्स्ट आणि सेकंट रनर्स अप ठरल्या.

२१ वर्षीय हरनाज पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. हरियाणातील शीख कुटुंबातील ती आहे. तिला फिटनेस आणि योगाची आवड आहे. २०१७ मध्ये तीने मिस चंदीगडचा किताब जिंकला होता तर मिस इंडिया २०१९ मध्ये भाग घेतला होता. या वर्षी सप्टेंबरमध्ये तिने मिस दिवा युनिव्हर्स इंडिया २०२१ चा मुकुट पटकावला. काही पंजाबी चित्रपटात तीने कामही केले आहे.
