सोनिया गांधी व शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त ‘सहस्त्रनामावली पुजा’

0
photo 11

सोनिया गांधी व शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त ‘सहस्त्रनामावली पुजा’

मुंबई, दि. १२ डिसेंबर:

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खा. सोनिया गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन त्यांच्या निरोगी दिर्घायुष्यासाठी श्री. सिद्धिविनायक गणपती मंदिर येथे सहस्त्रनामावली पुजा करण्यात आली.

सामाजिक व राजकीय कामात सतत अग्रेसर असणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव व सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे विश्वस्त राजाराम देशमुख यांनी या पूजेचे आयोजन केले होते. या पुजेला सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सोनिया गांधी यांचा ९ डिसेंबर रोजी तर शरद पवार यांचा १२ डिसेंबरला वाढदिवस होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *