मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी

0
Mumabi mayour 123

मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी..

मुंबई, दि. १० डिसेंबर :

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना भाजपा आमदार आशिष शेलार यांनी अपशब्द वापरल्याचे प्रकरण तापलेले असताना आता महापौरांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले आहे. या पत्रामध्ये महापौर पेडणेकर यांच्याबद्दल अश्लील भाषेचा वापर करत कुटुंब संपवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

धमकीचे पत्र हे पनवेलमधून कुरिअरने पाठवण्यात आलेले आहे. गुरुवारी संध्याकाळी हे पत्र महापौर बंगल्यावर आले. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. तसेच कुटुंबीयांसाठी संरक्षण देण्याची मागणी करणार आहेत.

महापौर पेडणेकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यावरून शिवसेना व भाजपा यांच्यात राजकीय वाद शिगेला पोहचला आहे. शेलार यांच्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करुन जामीनावर सुटका करण्यात आली आहे. हा गुन्हा रद्द करावा यासाठी शेलार यांनी हाय कोर्टात धाव घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *