CM बद्दल अर्नबने अनुद्गार काढूनही शिवसेना गप्प का?

0
20200802_215120

मुख्यमंत्र्यांबद्दल अर्नब गोस्वामीने अनुद्गार काढूनही शिवसेना गप्प का ?

राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी घेतला अर्नबचा समाचार !

मुंबई, दि. 2 ऑगस्ट

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अर्नब गोस्वामीने ज्या पद्धतीने कार्यक्रमात ऐकेरी भाषा वापरून अपमान केला त्यावरून संताप व्यक्त केला जात आहे. या चॅनल व पत्रकाराविरोधात कारवाई का केली जात नाही असा सवाल विचारला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता या गोस्वामीचा समाचार घेतला आहे परंतु शिवसेना मात्र याप्रश्नी अजून गप्प कशी ? याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आव्हाड यांनी ट्विट करून या प्रकाराचा निषेध केला आहे. आव्हाड म्हणतात, ज्या भाषेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध इंग्रजी आणि हिंदी चॅनेल मधील एका पत्रकाराने भाष्य केलं ते निंदनीय तर आहेच आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचं अपमान करणार देखील आहे. सत्य सामोरे येईल याबाबत शंका नाही.

सत्य हे मिडीयाच्या माध्यमातून सामोरे आणले जात आहे हे भासवणे हा अत्यंत गलिच्छ राजकारणाचा प्रकार आहे.ह्या पत्रकाराला चर्चेत राहण्याची सवय असल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध असे उद्गार काढले आहेत. त्याचा संपूर्ण महाराष्ट्रात निषेध करेल.

सुशांतसिंग राजपूत च्या मृत्यूचे राजकारण करून चौकशी CBI च्या हातात द्यावी असं म्हणणं म्हणजे महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारख आहे. या प्रकरणाची महाराष्ट्र पोलिसांनी चौकशी करावी अशी पहिली मागणी मीच केली होती आणि महाराष्ट्र पोलीसांनी देखील अत्यंत जलद गतीने पारदर्शक तपास चालवला आहे. बिहारच्या येणाऱ्या निवडणूका यासाठी महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचे हे राजकीय षडयंत्र रचलं जात असून याचा निषेधच करायला पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *