अमित शाह चंद्रकांत पाटील भेटीत काय घडले ?
अमित शाह चंद्रकांत पाटील भेटीत काय घडले ?
मुंबई, 25 नोव्हेंबर:
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह व सहकारमंत्री तसेच भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली.
चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांना भाजपाच्या राज्यातील संघटनात्मक कामाची माहिती दिली व त्यांचे मार्गदर्शन घेतले. राज्याच्या सहकार क्षेत्रातील विशेषतः साखर उद्योगातील महत्वाच्या विषयांबाबतही चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांना माहिती दिली. राज्यातील सद्यस्थितीबाबत उभय मान्यवर नेत्यांची चर्चा झाली.
