Param-Bir

फरार परमबीरसिंह मुंबईत दाखल..

 

मुंबई, दि. २५ नोव्हेंबर २०२१

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा गंभीर आरोप करुन गायब झालेले व न्यायालयाने ज्यांना फरार घोषीत केले होते ते मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंह आज अचानक मुंबईत हजर झाले.

 

मागील काही महिन्यांपासून परमबीरसिंह हे तपास यंत्रणांसमोर येण्यासाठी टाळाटाळ करत होते. फौजदारी गुन्हे दाखल असल्याने अटकेच्या भीतीने ते बेपत्ता होते पण सर्वोच्च न्यायालयाने ६ डिसेबरपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर ते आज समोर आले आहेत. गोरेगाव येथे परमबीरसिंह यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी त्यांची कांदिवलीमधील क्राइम ब्रांचच्या युनीट ११ मध्ये चौकशी साठी ते हजर झाले आहेत.

 

अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरन हत्याकांडानंतर परमबीरसिंह यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर परमबीर यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप करीत खळबळ उडवून दिली. देशमुख यांना या आरोपांमुळे पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि मनी लाँडरिंग प्रकरणात तुरुंगात जावे लागले. परमबीरयांच्या विरोधातही अनेक दाखल झालेल्या आहेत. परमबीरसिंह यांच्यावर मुंबई आणि ठाण्यात मिळून खंडणीचे पाच गुन्हे दाखल आहेत. याशिवाय दोन पोलिस अधिकाऱ्यांनी भ्रष्टचाराचे आरोप केले आहेत. त्याची लाचलुचपत विभागाकडून खुली चौकशी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *