देशमुखांवरील ‘वसुली’चे आरोप ऐकीव माहितीवर !

0
20211124_145029

देशमुखांवरील ‘वसुली’चे आरोप ऐकीव माहितीवर !

मुंबई, दि. २४ नोव्हेंबर :

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व सध्या गायब असलेले परमबीरसिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप हे ऐकीव माहितीवर केले होते असे त्यांच्या वकिलांनी चांदिवाल आयोगाला सांगितले आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले आहे असा खळबळजनक लेटबॉम्ब परमवीर सिंह यांनी टाकून महाराष्ट्रासह देशभर एकच धमाका केला होता. परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाची गंभीर दखल राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश के. यू. चांदीवाल यांची एक सदस्यीय समिती नेमली. पण या चौकशी समिती समोर परमवीरसिंह एकदाही हजर राहिले नाहीत.

परमवीर यांच्या वकिलांनी सांगितले की, परमबीरसिंह यांच्याकडे वसुलीसंदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध नाही. ही सर्व माहिती ऐकीव आहे. त्यामुळे ते साक्षीदार म्हणून उभे केले तरी त्याला कोणताही अर्थ असणार नाही. यावेळी परमबीरसिंह साक्षीदार म्हणून आयोगा समोर येण्यास इच्छुक नाहीत.

परमबीरसिंह यांच्या वसुलीच्या पत्रानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या विरोधात सीबीआय, ईडीकडून तपास सुरु असून सध्या ते जेलमध्ये आहेत. तर परमबीरसिंह सुप्रीम कोर्टाने अटकेपासून संरक्षण दिले आहे. परमबीरसिंह यांच्या विरोधात महाराष्ट्रात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. आपल्याला मुंबई पोलीस केव्हाही अटक करू शकतात. त्यांच्यापासून आपल्या जिवाला धोका आहे अशी सांगत परमबीरसिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी याचिका दाखल केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *