बंजारा समाजाचे चंद्रकांत राठोड समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये
बंजारा समाजाचे चंद्रकांत राठोड समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये..
मुंबई दि. 12 नोव्हेंबर :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच पक्षाचे नेते राजेश विटेकर यांच्या पुढाकाराने आज बंजारा समाजाचे नेते आणि सोनपेठ नगरपरिषदेचे गटनेते चंद्रकांत राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज जाहीर प्रवेश केला.
चंद्रकांत राठोड यांच्यासमवेत सोनपेठ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. जिजाबाई चंद्रकांत राठोड, नगरसेविका योजना दिगांबर पाटील, माजी उपनगराध्यक्ष दिगंबर भाडुळे पाटील, नगरसेविका नलिनी विनोद चिमनगुंडे, सौ. चंद्रकला भिमराव तिरमले, कुरेशी जुलेखाबी जिलाणी, राज सैदाबी जहीर, शेख मेराजबी इनुस, सदस्य रमाकांत राठोड, निलेश चंद्रकांत राठोड यांनी देखील पक्षात प्रवेश केला.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रेदरम्यान राजेश विटेकर यांनी परभणीत पक्षाची ताकद अधिक वाढणार आहे असे सांगितले होते.
बंजारा समाजाचे नेतृत्व करणाऱ्या एका चांगल्या नेत्याचा आपल्या पक्षात प्रवेश झाला आहे. भविष्यात बंजारा समाजासाठी राज्यसरकारच्या अनेक योजना राबवू, असेही जयंत पाटील यांनी आश्वासित केले. सोनपेठ नगरपरिषद अधिक बळकट करण्यासाठी आजचा दिवस महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही जयंत पाटील म्हणाले.
परभणी जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. जिल्ह्यातील विकासाची कामे पक्षाच्या माध्यमातून आपण नक्की करू. राठोड यांच्या पक्ष प्रवेशानंतर परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केले.
तसेच ज्या मान्यवरांनी पक्षात प्रवेश केला आहे त्यांना पक्षात योग्य तो सन्मान मिळेल असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला.
या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला खासदार सुप्रियाताई सुळे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी आमदार संदीप बजोरिया, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, परभणीचे नेते राजेश विटेकर, चंद्रकांतदादा राठोड, लक्ष्मीकांतराव देशमुख, दशरथराव सुर्यवंशी, मदनराव भोसले, ॲड. श्रीकांतराव विटेकर, सुहासराव काळे, उस्मान बाबा, ॲड. अशोकराव यादव, दिगांबरराव भाडुळेपाटील, डॉ. श्रीनिवास गुळभिले, अमर वडकर, शामसुंदर पंपटवार तसेच परभणी जिल्ह्याचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
