देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ ला मिळाले !

0
20211111_181004

देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ ला मिळाले !

नवी दिल्ली, दि. ११ नोव्हेंबर
सतत वादग्रस्त विधान करुन चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने पुन्हा गरळ ओकली आहे. ‘देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ साली मिळाले, १९४७ ला मिळाली ती भीक’, असे विधान करून कंगणाने आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत.

कंगणा म्हणते, ‘सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेताजी बोस यांना माहित होतं की स्वातंत्र्य लढ्यात रक्त वाहणार. पण ते रक्त्त भारतीयांचं नसावं. तेव्हा मिळाली ती भीक होती. ते स्वातंत्र्य नव्हतं. खरं स्वातंत्र्य २०१४ ला मिळालं.’

कंगनाचा पद्मश्री पुरस्कार देऊन दोन दिवसापूर्वीच सन्मान करण्यात आला. मात्र आज तीने केलेल्या वक्तव्याने सोशल मीडियावर ती प्रचंड ट्रोल झाली. सामाजिक, राजकीय क्षेत्रातूनही कंगणावर टीकेची झोड उठली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *