नगर रुग्णालयातील 11 निष्पाप बळी घेणार्या दोषींवर कठोर कारवाई करा.
नगर रुग्णालयातील 11 निष्पाप बळी घेणार्या दोषींवर कठोर कारवाई करा.
मुंबई, दि. 7 नोव्हेंबर:
राज्यात भंडारा जिल्हा रूग्णालयातील आगीसारख्या
अनेक घटना घडूनही सरकारने कोणताही धडा घेतलेला नाही. अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
नगर जिल्हा रूग्णालयात आयसीयू कक्षात लागलेल्या भीषण आगीची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या शोकसंवेदना व्यक्त करत फडणवीस म्हणतात, नगरच्या घटनेत पोलिसांनी जे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले, त्यात आग सीलिंगमधून सुरू झालेली दिसते, महापालिकेकडून फायर सेफ्टी प्राप्त नाही. वायरिंगबाबत इलेक्ट्रीकल अभियंत्याने कळविलेले, हायड्रेशन आणि स्प्रिंकलर प्रणालीला आर्थिक मंजुरी आरोग्य आयुक्तांकडे काही महिन्यांपासून प्रलंबित आहे. अहमदनगर सामान्य रूग्णालयाची ही आहे दुरावस्था. 11 निष्पाप बळी घेणार्या सर्वच दोषींवर कठोर कारवाई व्हावी.
शेवटी या घटनेची कुणी जबाबदारी घेणार की नाही? असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे.
