नगर जिल्हा रुग्णालयाच्या आगीत १० जणांचा मृत्यू

0
20211106_193535

नगर जिल्हा रुग्णालयाच्या आगीत १० जणांचा मृत्यू..

अहमदनगर, दि. ६ नोव्हेंबर:
अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला सकाळी साडेदहा वाजता आग लागली. या विभागात १७ कोविड रूग्ण दाखल होते. यापैकी दहा रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला तर १ रूग्ण अत्यवस्थ आहे. इतर रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे‌, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिली.

आयसीयू वॉर्डात आग लागली त्यावेळी एकूण 20 रुग्ण उपचार घेत होते.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. रुग्णालयातील नर्सेस, वॉर्ड बॉय आणि डॉक्टरांच्या मदतीने रुग्णांना इतरत्र हलविण्यास सुरुवात केली. ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण रुग्णालयात धुराचे लोट पसरले होते. आयसीयू वॉर्डात लागलेल्या या आगीने अवघ्या काही क्षणात संपूर्ण वॉर्ड जळून खाक झाले.

जिल्हाधिकारी भोसले म्हणाले, नाशिक येथे झालेल्या गॅस गळतीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यात आले होते. मात्र तरीही दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबतची चौकशी करण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *