देगलूर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जितेश अंतापूरकरांचा दणदणीत विजय

0
FB_IMG_1635864476718

देगलूर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जितेश अंतापूरकरांचा दणदणीत विजय.

नांदेडमध्ये अशोक चव्हाणच शेर बाकी सब ढेर!

नांदेड, दि. 2 नोव्हेंबर:
नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार जितेश अंतापूरकर यांचा 45 हजारांपेक्षा जास्त मतांनी दणदणीत विजय झाला. देगलूरच्या विजयाचे शिल्पकार सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण असून त्यांनी भाजपाला चारीमूंड्या चित केले. भाजपाचे एक केंद्रीय मंत्री तळ ठोकून बसले होते तर राज्यातील भाजपाच्या महत्त्वाच्या नेत्यांनीही सर्व ताकद लावली पण अशोक चव्हाणांच्या रणनितीपुढे ते सपशेल फेल ठरले.

पोटनिवडणुकीतील विजयानंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले की, देगलूरच्या विजयाने महाविकास आघाडी व राज्य सरकार भक्कम नक्कीच झाले आहे. राज्यातील सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु असताना जनतेने दिलेला हा कौल महत्त्वाचा आहे. देशात झालेल्या निवडणुकांच्या निकालावरुन जनता भाजपच्या विरोधात आहे हे चित्र स्पष्ट आहे. जितेश अंतापूरकरांना विजयी करून मतदारांनी स्व. आ. रावसाहेब अंतापूरकरांना खरी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उमेदवारी देण्यासंदर्भात घेतलेला निर्णय असो, राहुल गांधींची त्यामधील भूमिका असो, त्यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार, या सर्वांच्या आशीर्वादाने देगलूरला जितेश अंतापूरकर विजयी झाले.

देगलूर पोटनिवडणुकीत मी विकासाचा अजेंडा मांडला, तर भाजपने वैयक्तिक टिकेवर भर दिला. परिणाम सर्वांसमोर आहे. एमआयएम किंवा वंचितला मत देणं भाजपसाठी फायदेशीर ठरतं, याची मतदारांना जाणीव झाली आहे. या निवडणुकीत वंचितचा उमेदवार असणं भाजपच्याच रणनीतीचा भाग होता, पण लोकांनी ही रणनीती ओळखली असे चव्हाण म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *