परमवीर यांंना गायब करणे हा आघाडी सरकारचा डाव

0
20211102_135428

परमवीर यांंना गायब करणे हा आघाडी सरकारचा डाव

मुंबई, दि. 2 नोव्हेंबर :
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग गायब असतील, पळुन गेले असतील तर गायब होण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कारणीभूत असल्याचा आरोप भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

परमबीरसिंग राज्यातून पळून गेला कसा? याचे उत्तर नवाब मलिक यांनी आधी द्यायला हवे, असं आव्हान शेलार यांनी मंत्री मलिक यांना दिलं आहे. परमबीरसिंग पळून गेले याला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. परमबीरसिंग पळून गेला मात्र त्यांचे निवासस्थान तर इथेच होते ना? रेशनकार्ड, आधार कार्ड हे इथलेच होते ना? महाराष्ट्र सरकार त्यांना पळायला मदत करीत आहे.

ते पळून गेले असतील तर ज्या देशात जातील तिथे त्यांना आश्रय मिळावा याचा प्रयत्नही राज्य सरकार करतंय. परमबीर सिंग यांच्याकडे या सरकार विरोधात बरीच माहिती आहे. ते जर सापडले तर सरकारचे पित्तळ उघडे पडेल, त्यामुळेच सरकार पळायला मदत करतंय, हा एक डाव आहे, असा दावा शेलार यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *