अनिल देशमुख अखेर ईडी कार्यालयात हजर

0
20210220_201953

अनिल देशमुख अखेर ईडी कार्यालयात हजर..

मुंबई, दि. १ नोव्हेंबर :
मागील काही दिवसांपासून गायब असलेले माजी गृहमंत्री आज अचानक अवतरले आणि ईडीच्या कार्यालयात हजर झाले. १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणातून त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. व त्यांच्यामागे ईडी, सीबीआयच्या चौकश्या लागल्या आहेत. ईडीने देशमुख यांना ५ वेळा समन्स बजावले होते पण ते न्यायालयात धाव घेत होते. पण आज अचानक ते ईडीच्या कार्यालयात त्यांच्या वकिलासह हजर झाले.

ईडी कार्यालयात हजर होण्याआधी देशमुखांनी एक व्हिडिओ जारी केला, त्यात ते म्हणतात की, परमबीर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केले ते सिंग आज कुठे आहेत? ज्या बातम्या येत आहेत त्यानुसार परमबीर सिंग भारत सोडून पळून गेले असल्याचे समजत आहे. ज्याने आमच्यावर आरोप केला तोच पळून गेला. आज सिंग यांच्या विरोधात त्यांच्याच खात्यातील अधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या. अनेक व्यावसायिकांनीही तक्रारी केल्या आहेत. अशा माणसाच्या तक्रारीवरून माझी चौकशी होत आहे, याचं दु:ख आहे.

परमबीरसिंग यांचा सहकारी सचिन वाझेनेही सिंग यांच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले. आज सचिन वाझे खुनाच्या आरोपावरून आतमध्ये आहे. सचिन वाझे यापूर्वी सुद्धा अनेकदा तुरुंगात होते. मी गृहमंत्री असताना सचिन वाझेंना नोकरीतून काढण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यांना नोकरीतून काढल्यावर त्यांनी माझ्यावर आरोप केले. परमबीरसिंग आणि वाझेंच्या आरोपावर माझी चौकशी होत आहे. माझ्या कुटुंबाला त्रास दिला जात आहे. त्याचं मला दु:ख होत आहे.

मी सुप्रीम कोर्टातही याचिका दाखल केली आहे. त्याचा निकाल आल्यावर मी स्वत: ईडीच्या कार्यालयात येईल असे सांगितले होते. सीबीआयने दोनदा समन्स दिले. दोनदा मी त्यांच्या कार्यालायत जाऊन स्टेटमेट दिले. आज मी स्वत: ईडीच्या कार्यालयात हजर झालो आहे, असे ते म्हणतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *