नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध !

0
20211101_133115

नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध !

मुंबई, दि. १ नोव्हेंबर :
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांच्या निशाण्यावर दररोज एकजण असतो. अनेक गंभीर आरोप करुन मलिक यांनीराज्याच्या राजकारणात राळ उडवून दिली आहे. त्यांच्या निशाण्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. आज त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्याला फडणवीस यांनीही पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत असा आरोप लावून आरोप प्रत्यारोपाच्या मालिकेत आणखी भर घातली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नवाब मलिकांनी लवंगी फटाका लावलाय आता त्यांनी लक्षात ठेवावे दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडणार आहे. कारण मी काचेच्या घरात राहत नाही. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डसोबत आहेत अशा लोकांनी माझ्यासोबत बोलू नये. यासंदर्भातील पुरावे तुमच्या समोर मांडेन तसेच शरद पवार यांच्याकडेही हे पुरावे पाठवणार आहे. सुरुवात त्यांनी केली शेवट मी करणार आहे.

नवाब मलिक यांनी सकाळी ट्विटरवरुन, चलो आज भाजपा और ड्रग्स पेडलर के रिश्तों पे चर्चा करते है, या कॅप्शनसह फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा फोटो ट्विट केला. अमृता फडणवीस यांच्यासोबत फोटोत असणारी व्यक्त ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा मलिक यांनी करुन खळबळ उडवून दिली.

नवाब मलिक यांनी जाणीवपूर्वक माझ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला याच्या पाठीमागची मानसिकता दिसत आहे. रिव्हर मार्चने स्पष्ट केले आहे की तो भाड्याने आणलेला माणूस आहे. त्यामुळे त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *