भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांचा खास सहकारी वानखेडेला ईडी कार्यालयात भेटतो.
भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांचा खास सहकारी वानखेडेला ईडी कार्यालयात भेटतो.
मुंबई दि. ३१ ऑक्टोबर :
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांचा धमाक्यांचा सिलसीला कायम आहे. आज नवाब मलिक यांनी ईडी, समीर वानखेडे व भाजपाच्या संबंधावर हल्लाबोल केला.
भाजपचा एक दूत जो माजी मुख्यमंत्र्यांच्या किचन कॅबिनेटमध्ये होता तो जाऊन समीर वानखेडेला ईडीच्या कार्यालयात भेटतो. तो इतका जवळचा आहे की, माजी मुख्यमंत्री त्याच्या घरीही जात होते. ज्याला मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये सहज प्रवेश होता. तो चेंबूरमध्ये राहतो. जेव्हापासून मी हा विषय लावून धरला आहे तिथपासून हा गृहस्थ ईडी कार्यालयात जात आहे. तो का जातो? कुणासाठी जातो? कुणाच्या मनात काय भीती आहे? हे सगळं फर्जीवाडा करुन सुपारी वाजवण्याचे काम होते का? असे अनेक सवाल मंत्री व
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उपस्थित केले आहेत.
नवाब मलिक म्हणाले की, या चेंबूरच्या गृहस्थाच्या माध्यमातून काय चाललंय? हा का जातो आणि कशासाठी जातो याची माहिती आतले अधिकारी सांगत आहेत. जर समीर वानखेडेवर भाजपचे प्रेम असेल तर त्याला उघडपणे भेटा ना, दूताच्या माध्यमातून कशाला भेटता? अशी विचारणा करतानाच संपूर्ण भाजप आणि त्यांच्या महाराष्ट्रातील नेत्यांचे काहीतरी गौडबंगाल सुरू आहे.. धुगधुगी त्यांच्या मनात सुरू आहे.
