नॅशनल चॅम्पियन विजेत्या खेळाडूंचा गौरव
नॅशनल चॅम्पियन विजेत्या खेळाडूंचा गौरव
मुंबई, दि. 30 ऑक्टोबर:
वारंगल तेलंगणा व दिल्ली येथे पार पडलेल्या नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत नाशिकच्या विजयी खेळाडूंचा नाशिक भुजबळ फार्म येथील कार्यालयात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
वारंगल येथे पार पडलेल्या नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत महाराष्ट्राला एकूण पाच पदके मिळाली. त्यातील ४ पदके ही नाशिकच्या खेळाडूंना मिळाली आहेत. तसेच दिल्ली येथे झालेल्या २३ व्या नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत महाराष्ट्राला एकूण ८ पदके मिळाली त्यातील ६ पदके नाशिकच्या खेळाडूंना मिळाली आहे.
यामध्ये संजीवनी जाधव हिला १ गोल्ड, १ सिल्व्हर मेडल, कोमल जगदाळे हिला २ गोल्ड व २ सिल्व्हर मेडल, आदेश यादव यास १ गोल्ड, किसन तडवी यास १ गोल्ड तर अजय राठी यास १ गोल्ड व २ सिल्व्हर मेडल मिळाले. या सर्व खेळाडूंचा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सर्व खेळाडूंना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या खेळाडूंना नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, क्रीडा व कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया व महेंद्रा व महेंद्रा यांचे सहकार्य लाभले.
